Dropdown Code

Remote

निवृत्तीदासू या वेबसाट वर आपले सहर्ष स्वागत आहे

।। सद्गुरू निवृत्तीनाथ ।।


।। श्री. संतश्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथ माऊली ।।

फळले भाग्य माझे l  धन्य झालो संसारी l
सद्गुरू भेटले हो  l त्यांनी धरियेले करी  l

पश्चिमेशी चालविले l आत्मस्थिती निर्धारी l 
त्रिकुटावरी नांदे l  देखियेले पंढरी l 
ते सुख काय सांगू  l वाचे बोलता न ये l 
आरतीच्यानी योगे गेले मी पण मागे l 
ते सुख काय सांगू ll

राऊळांमाजी जाता l राहे देह अवस्था l 
मन हे उन्मन झाले l नसे बद्धतेचि वार्ता l 
हेतु हा मावळला ल शब्दा आली निशब्दता l 
तटस्थ होऊनी ठेले l  निजरूप पाहता l 
ते सुख काय सांगू  ll

आरती विठ्ठलाची  l पुर्ण उजळली अंतरी l 
प्रकाश थोर झाला  l साठवेना अम्बरी  l 
रवि शशी मावळले  l तया तेजा माझारी  l 
वाजती दिव्य वाद्ये  l  अनह्रीत गजरी  l 
ते सुख काय सांगू  ll

आनंद सागरांत  l प्रेमे बुडी दीधली l 
लाभले सौख्य मोठे l न ये बोलता बोले l 
सद्गुरुचेनी संगे  l ऐसी आरती केली  l 
निवृत्ती आनंदात l तेथे वृत्ती  निमाली  l 

ते सुख काय सांगू  ll 

No comments:

Post a Comment

।। सद्गुरू निवृत्तीनाथ ।।

।। श्री. संतश्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथ माऊली ।। फळले भाग्य माझे l  धन्य झालो संसारी l सद्गुरू भेटले हो  l त्यांनी धरियेले करी  l पश्चिमेशी ...