।। श्री. संतश्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथ माऊली ।।

हे गुह्य ज्ञान पार्वतीस दिले । मच्छिंद्रा लाधले हेचि ज्ञान ।।
मच्छिंद्राने दिले गोरक्षाचे हाती । तेचि चौरंगीप्रती उपदेशिले ।।
चौरंगीने दिले भर्तृहरीचे हाती । तेणे गैनिप्रति उपदेशिले ।।
का रुक्मादेवी निवृत्ती दयाळ । त्यांनीच आपणास उद्धारिले ।।
ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई । निवृत्तीचे पायी सर्व सुख ।।